Forgive but never forget


ज्या दिवसापासून माकड मगरीच्या तावडीतून सुटून परत आपल्या झाडावर आला होता त्या दिवसापासून त्याला अस्वथ वाटत होते. त्याने आणि मगरीने घालविलेले आनंदाचे क्षण त्याला नेहमी आठवत. मगरीच्या पाठीवर केलेला सैर सपाटा. एकत्र खाल्लेली जांभळे. किनाऱ्यावर उन्हामध्ये बसून मारलेल्या गप्पा. एक ना अनेक.


पण आता काहीही फायदा नव्हता ते दिवस गेले होते आणि माकडाचे दैवें बलवत्तर म्हणून तो मगरीच्या कारस्थानातून वाचला होता.

मगर सुद्धा त्या दिवसांनंतर तिकडे फिरकले नव्हते.

असे कित्येक महिने निघून गेले. माकड आता आपल्या दुसऱ्या मित्रांसोबत मजेत दिवस घालवू लागलं होता. अचानक एक दिवस सकाळीच त्याला त्याच्या जांभळाच्या झाडाखाली मगर दिसला. मगर माकड जागे होण्याची वाट पाहत होता. मगराने झाल्या गोष्टींबद्दल माकडाची क्षमा मागितली . आणि पुन्हा एकदा मैत्री सुरु करण्याची विनंती केले. माकडाला काही कळेना. हाच तो मगर होता ज्याच्या तावडीतून माकड वाचला होता. त्या दिवशी माकडाने मगाराला भाव नाही दिला. दुसऱ्या दिवशी मगर पुन्हा आला. आता माकडाला खरेच कळेना काय करावे. त्याला कुणीतरी सांगितलेली म्हण आठवली. "उत्तम क्षमा". माकडाने मगाराला क्षमा केले. आणि तो त्याच्याबरोबर निघाला.


शेवटी व्हायचे तेच झाले. मगर आणि मगरीणीने माकडावर ताव मारला.

------



तात्पर्य :- Forgive but never forget . क्षमा करणे हा माणसाचा धर्म आहे. आणि क्षमा केली आणि मागितली तरच माणूस जगू शकतो. परंतु मागील चुका विसरणे घातक असते. तश्या चुका पुन्हा होणार नाहीत ह्याची खबरदारी घ्यावी लागते. नाहीतर ताव मारण्यासाठी तर अनेकजण तयार असतातच, ह्या गोष्टीत माकडाने मगरीला क्षमा करून आपले आयुष्य दुसऱ्या मित्रांबरोबर घालवणे अगदी स्तुत्य. पण परत तीच चूक करणे प्राण घातक


Forgive but Never Forget


By JK

Comments